लखनौ – समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना चिथावणीखोर भाषण प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने आझम खानला दोन वर्षांचा कारावास आणि अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षेच्या प्रश्नावर आझम खान यांचे वकील आणि फिर्यादीची बाजू ऐकून घेण्यात आली. आझम खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
आझम खान यांच्यावर आरोप आहे की, 18 एप्रिल 2019 रोजी धामारा गावात एका जाहीर सभेत त्यांनी घटनात्मक पदांवर असलेल्या लोकांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती; ज्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.
त्यानंतर एडीओ सहकार अनिल चौहान यांनी आझम खान यांच्याविरोधात शहजादनगरमध्ये गुन्हा दाखल केला होता. विचारविनिमय केल्यानंतर, पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आणि सुनावणीनंतर, शनिवारी आझम खानना चिथावणीखोर भाषण प्रकरणात दोषी ठरवण्यात आले.