पोचेफस्टोर्म – गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, नेतृत्व व फलंदाजी या चारही क्षेत्रांत अफलातून सातत्य राखताना भारताच्या 19 वर्षांखालील मुलींच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना आयसीसीच्या पहिल्या वहिल्या 19 वर्षांखालील #U19T20WorldCup विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत भारतीय संघाने इंग्लंडची वाताहत करत 7 गडी ( Indian U19 Women’s team defeated England by 7 wickets ) राखून या सामन्यासह विजेतेपदावरही शिक्कामोर्तब केले.
What a moment this for the @TheShafaliVerma led #TeamIndia 🙌🙌 pic.twitter.com/4yfQMZlKNe
— BCCI Women (@BCCIWomen) January 29, 2023
भारतीय संघाची कर्णधार शफाली वर्माने नाणेफेक जिंकत #INDvENG इंग्लंडला पहिल्यांदा फलंदाजी दिली. तिचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवताना इंग्लंडच्या फलंदाजीची वाताहत केली. भारताच्या संमिश्र गोलंदाजीसमोर इंगलंडचा डाव 17.1 षटकांत अवघ्या 68 धावांत संपुष्टात आला. इंग्लंडकडून रायना गे 19, निमाह हॉलंड 13 व अलेक्सा स्टोनहाऊस आणि सोफिया स्मेल यांनी प्रत्येकी 11 धावा केल्या. त्यांच्या अन्य एकाही फलंदाजाला दोन अंकी धावा करता आल्या नाहीत. भारताकडून #TitasSadhu तेतास साधू, पार्शवी चोप्रा व अर्चना देवी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सोनम यादव, मन्नत कश्यप व शफाली वर्मा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
CHAMPIONS 🫡🎉#TeamIndia pic.twitter.com/BXJEnrJu6w
— BCCI Women (@BCCIWomen) January 29, 2023
विजयासाठी आवश्यक 69 धावा भारतीय संघाने 14 व्या षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या व यंदाची पहिली विश्वकरंडक स्पर्धा जिंकली. भारताच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार शफाली वर्मा 15 धावा काढून बाद झाली. त्यानंतर लगेचच श्वेता शेरावत 5 धावांवर परतली. यावेळी संघाची स्थिती 2 बाद 20 अशी बिकट बनली होती. त्यानंतर सौम्या तिवारी व गोंगडी त्रिशा यांनी डाव सावरताना संघाचे अर्धशतक फलकावर लावले.
त्रिशा स्थिरावलेली असताना 24 धावांवर बाद झाली. या खेळीत तिने 29 चेंडूत 3 चौकार फटकावले. ती परतल्यावर मात्र, सौम्याने एकहाती विजय मिळवून दिला. तिने नाबाद 24 धावा करताना 37 चेंडूत 3 चौकार फटकावले. इंग्लंडकडून अलेक्सा स्टोनहाऊस, हनाह बाकेर व ग्रेसी स्क्रीवान्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
Titas Sadhu bowled an excellent economical spell with bowling figures of 2-6 & bagged the Player of the Match award as #TeamIndia are crowned champions of the inaugural #U19T20WorldCup 👏👏 pic.twitter.com/srB6cQXY2a
— BCCI Women (@BCCIWomen) January 29, 2023
संक्षिप्त धावफलक –
इंग्लंड महिला संघ – 17.1 षटकांत सर्वबाद 68 धावा. (रायना गे 19, निमाह हॉलंड 13, अलेक्सा स्टोनहाऊस 11, सोफिया स्मेल 11, तेतास साधू 2-6, पार्शवी चोप्रा 2-13, अर्चना देवी 2-17).
भारत महिला संघ – 14 षटकांत 3 बाद 69 धावा. (शफाली वर्मा 15, गोंगडी त्रिशा 24, सौम्या तिवारी नाबाद 24, अलेक्सा स्टोनहाऊस 1-8, हनाह बाकेर 1-13, ग्रेसी स्क्रीवान्स 1-13).