नवी दिल्ली – भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सरस कामगिरी करत असला तरीही माजी कर्णधार व फिनिशर महेंद्रसिंग धोनीची संघाला गरज आहे, असे मत माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू महंमद कैफ याने व्यक्त केले आहे.
धोनीसारखा खेळाडू त्याच्या अनुभवातून नवोदितांना मार्गदर्शन करू शकतो व आजच्या संघातील नवोदितांची संख्या पाहता भविष्यातील सेकंड बेंच भक्कम व्हावा यासाठी धोनीचा संघात समावेश असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 2013 सालानंतर भारतीय संघाने कोणतीही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. गेल्या वर्षी झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील अपयशानंतर धोनीने विश्रांती घेतली होती. त्याचा दबदबा संपला असे टीकाकार म्हणत असले तरीही त्याच्यासारखे खेळाडू पुन्हा दमदार पुनरागमन करू शकतात, असेही कैफने सांगितले.