जिनिव्हा – अफगाणिस्तानबाबत संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. संयुक्त राष्ट्रानुसार, अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानचे 6500 दहशतवादी आहेत. यात लश्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मदचे 1 हजार दहशतवादी आहेत.
अमेरिका लवकरात लवकर अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याचा विचार करत आहे. पाकिस्तानी दहशतवादी तालिबानसोबत मिळून अफगाणिस्तान सरकार आणि अमेरिकन सैनिकांच्या विरोधात हिंसाचार करत आहेत.
तहरीक ए तालिबान पाकिस्तान, जैश ए मोहम्मद आणि लश्कर ए तैयबा या पाकिस्तानी गटांचा समावेश आहे. जैश आणि लश्कर दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात घुसण्यास मदत करतात. हे लोक सल्लागार, प्रशिक्षक आणि आयईडी बनवण्यास मदत करतात.
हे दहशतवादी नानगरहार प्रांतात सक्रिय आहेत. अफगाणिस्तानात सक्रिय असलेले पाकिस्तानचे दहशतवादी अंमली पदार्थांची तस्करी करतात. ही तस्करी हेच तालिबानच्या कमाईचे मुख्य साधन आहे.