टोरांटो/नवी दिल्ली – भारतीय विद्यार्थ्याची कॅनडाच्या टोरांटो शहरातील उपनार्ग स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. कार्तिक वासूदेव असे त्याचे नाव आहे. सेंट जेम्स शहराच्या ग्ने रोड प्रवेशद्वारावर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्याच्या प्राथमोपचार करून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार करण्यापुर्वी त्याचा मृत्यू झाला होता, असे पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे.
त्याकाळात रेल्वे स्थानकात असणाऱ्या साक्षिदारांशी बोलल्यानंतर तपासाची दिशा स्पष्ट होईल. तेथे असणाऱ्या कॅमेऱ्यात चेहरे असणारे वाहनचालक आणि व्यावसायिकांकडे सीसीटीव्हीचे फुटेज मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.
टोरांटोमध्ये काल भारतीय युवकाची गोळ्या घालून झालेलल्या हत्येने आम्हाला धक्का बसला आहे. असे ट्विट भारताच्या तेथील राजदुतांनी केले आहे. आम्ही त्याच्या कटुंबियांच्या संपर्कात आहोत. त्याचे पार्थिव मायदेशी पाठवण्यासाठी योग्य ती सर्व मदत आम्ही करत आहोत, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी या हत्येबाबत शोक व्यक्त केला आहे. वासूदेवच्या भावाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, तेथील सेनेका महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला होता. आपल्या कामावर जात असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. तो कॅनडात जानेवारी महिन्यात आला होता.
सेनेका महाविद्यालयाने सांगितले की, विक्री व्यवस्थापन कार्यक्रमासाठी वासूदेवने नाव नोंदवले होते. त्याच्या हत्येच्या वृत्ताने महाविलयाच्या परिवाराला शोक झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोर युवक कृष्णवर्णीय असून त्याची उंची पाच फूट सहा इंच ते पाच फूट सात इंच आहे. त्याची शरीरयष्टी मध्यम बांध्याची आहे. दक्षिण ग्लेन रस्त्याच्या दिशेने हॅंडगन घेऊन जाताना अखेरचा तो दिसला होता.