Indian student | America – अमेरिकेत उमा सत्य साई या विद्यार्थ्यानंतर आता अब्दुल अराफात या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला आहे. गेल्या महिन्यापासून बेपत्ता असलेला हा २५ वर्षीय विद्यार्थी क्लीवलँड येथे मृतावस्थेत आढळून आला आहे.
मुळचा हैदराबाद येथील असेला मोहम्मद अब्दुल अराफत याच्या मृत्यूमुळे अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जाते आहे.
अब्दुल अराफातचा मृत्यू ही अशा प्रकारची या आठवड्यातील दुसरी घटना असून या वर्षांत आतापर्यंत ११ भारतीय विद्यार्थ्यांचा अमेरिकेत मृत्यू झाला आहे. । Indian student | America
न्यूयॉर्क येथील भारताच्या वाणिज्य दुतावासाने अब्दुल अराफातच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला असून आम्ही स्थानिक तपास संस्थांच्या संपर्कात असल्याचेही म्हटले आहे. अब्दुल अराफातचे पार्थिव भारतात आणण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारचे सहाय्य केले जाईल असे दुतावासाने म्हटले आहे.
१२०० डॉलरची मागितली होती खंडणी । Indian student | America
अब्दुल अराफात ७ मार्च २०२४ पासून बेपत्ता होता. त्याचे वडिल मोहम्मद सलिम यांच्या म्हणण्यानुसार अब्दुल बेपत्ता झाल्यानंतर दहा दिवसांनी त्यांना एक फोन आला होता. तुमच्या मुलाचे अपहरण केले असल्याचे कॉल करणाऱ्यांनी आपल्याला सांगितले.
त्याच्या सुटकेसाठी आरोपींनी १२०० डॉलरची खंडणीही मागितली होती. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. अमेरिकेतल्या भारतीय दुतावासाच्या माध्यमातून अब्दुल अराफातचा शोधही सुरू होता मात्र त्याचा मृतदेह आता हाती लागला आहे. । Indian student | America