महाळुंगे इंगळे (वार्ताहर) – महाळुंगे इंगळे येथील हरवलेल्या युवकाचे अपहरण करून सिनेस्टाइलने खून करून मृतदेह जाळून टाकल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार राहुल पवार (रा. महाळुंगे इंगळे) हा निष्पन्न झाला असून तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगिले.
दरम्यान, याप्रकरणी एका आरोपीला यापूर्वीच अटक केली असून त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर खुनाचा उलगडा पोलिसांना झाला आहे. तर पोलीस तपास सुरू असल्याने पकडलेल्या आरोपीबाबत पोलिसांनी माहिती देण्यास असमर्थतता दर्शविली आहे. आदित्य युवराज भांगरे (वय 18) असे खून झालेल्य तरुणाचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, मागील आठ ते दहा दिवसांपूर्वी आदित्यचे अज्ञातांनी अपहरण झाले होते. तर त्याच्या नातेवाइकांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तो हरवला असल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी तपासाच चक्र फिरविली.त्यात आरोपींनी आदित्यला त्याच्या घराजवळून एका कारमध्ये बसून त्याला गुजरातच्या दिशेने घेऊन गेले.
वाटेत त्याचा गळा दाबून आरोपींनी त्याचा खून केला. तसेच त्याला महाराष्ट्र गुजरात सीमेलगतच्या जंगलात जाळून टाकण्याचा प्रयत्न देखील केला गेला, अशी माहिती पोलिसांनी समोर आली असून मुख्य सूत्रधाराच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राहुल पवार याचा छोटा लहान भाऊ रितेश पवार याचा मागील चार महिन्यांपूर्वी काही तरुणांनी खून केला होता. या खुनात आदित्यने मदत केली असल्याचा संशय असल्याने राहुल पवारने आदित्य भांगरे याचा सिनेस्टाईल पद्धतीने खून केला आहे. – डॉ. शिवाजी पवार, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड पोलीस परिमंडळ