फिर भी दिल है हिंदुस्तानी! भारतातील ऑक्सिजनचा तुटवडा पाहून मदतीसाठी धावले व्यावसायिक विनोद खोसला; 1 कोटी डाॅलरची मदत जाहीर

ह्युस्टन – भारतीय वंशाचे अमेरिकेतील व्यावसायिक विनोद खोसला यांनी भारतातील रुग्णालयांना ऑक्‍सिजन पुरवठा करण्यासाठी 1 कोटी अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की भारतातील रुग्णांचे प्राण वाचवण्याची गरज आहे, त्यात उशिर झाला तर आणखी बळी जाण्याची शक्‍यता आहे.

आमच्याकडे रोज असंख्य ऑक्‍सिजन सिलिंडर्स, व्हेंटिलेटर्स, आयसीयु बेडसाठी मदत मागीतली जात आहे. ती मदत पहाता आम्ही जाहीर केलेली ही मदत खूपच कमी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

भारतातील गिव्ह इंडिया संस्थेला त्यांनी ही 1 कोटी डॉलर्सची मदत पाठवली आहे. अनेक देशांनी भारताला वैद्यकीय सामग्री तसेच अन्य औषधांची मदत पाठवली असून, व्यक्तीगत पातळीवरही लोक भारताच्या मदतीसाठी पुढे येऊ लागले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.