मुंबई – देशात करोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे तातडीने करोना लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे. मात्र लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिम रखडली आहे. त्यातच लस निर्माता कंपनी सीरम इन्स्टीट्यूटचे अदर पूनावाला यांनी आपल्याला धमक्या मिळत असल्याचे सांगत सुरक्षेसाठी लंडन गाठले आहे. यावरून राजकारण तापलं आहे.
“काही मोठे नेते माझ्यावर दबाव आणतायत. मी जर बोललो तर माझा शिरच्छेद होईल” असा मोठा खुलासा अदर पूनावाला यांनी केले होता. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
Adar Poonawalla (Serum Institute of India CEO) said that he was threatened by some senior leaders. Congress takes full responsibility of his security. But he should make it public as to who are these leaders: Maharashtra Congress Chief Nana Patole pic.twitter.com/NKmXjxPbDM
— ANI (@ANI) May 3, 2021
दरम्यान नाना पटोले म्हणाले की, अदर पूनावाला यांनी म्हटल्यानुसार त्यांना लसीच्या पुरवठ्यासाठी धमक्या मिळत आहेत. धमकी देणाऱ्यांची नावं त्यांनी उघड करायला हवी. काँग्रेस पक्ष त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास तयार आहे. मात्र त्यांनी धमकी देणाऱ्यांची नावं उघड करायला हवी, असंही ते म्हणाले.