डॉ. श्रीराम गडकर यांना ‘शिक्षणमहर्षी तांबटकाका पुरस्कार’

बारामती : बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. श्रीराम गडकर यांना कोल्हापूर येथील शांताई शिक्षण संस्थेच्यावतीने दिला जाणारा 2019-20 चा राज्यस्तरीय शिक्षणमहर्षी तांबटकाका पुरस्कार ‘ जाहीर झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दिनकर विष्णू पाटील यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

डॉ. श्रीराम गडकर यांची एक प्राध्यापक या नात्याने त्यांचे अध्ययन, अध्यापन, मूल्यमापनासोबतच विद्यार्थीकेंद्री उपक्रमशीलता, ज्ञानाच्या विस्ताराचं कार्य, संशोधन, लेखन, व्याख्यानं, इ. पैलूंची दखल या पुरस्कारासाठी घेण्यात आल्याचे प्राचार्य डॉ. दिनकर विष्णू पाटील यांनी सांगितले. आजच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन पूर्वपदावर आल्यावर समारंभपूर्वक हा पुरस्कार कोल्हापूर येथे प्रदान करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे, मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंदा गांगुर्डे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी व माजी विद्यार्थी, मित्रमंडळी, नातेवाईक यांनी डॉ. श्रीराम गडकर यांचे अभिनंदन केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.