अनेक भारतीय लोकं दलित, मुस्लीम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत

राहुल गांधी यांनी पुन्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उत्तर प्रदेश पोलिसांवर घणाघाती केली टीका

नवी दिल्ली – देशभरात आक्रोश निर्माण करणाऱ्या हाथरस बलात्कार प्रकरणात रोज नवे धक्के बसत आहेत. या प्रकरणाचा तपास  उत्तर प्रदेशचे विशेष पथक करत आहेत. यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उत्तर प्रदेश पोलिसांवर घणाघाती टीका केली आहे.

काय म्हणाले राहुल  गांधी

लज्जास्पद सत्य म्हणजे अनेक भारतीय दलित, मुस्लीम आणि आदिवासींना माणूस समजत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे (उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ) व त्यांच्या पोलिसांचं म्हणणं आहे की, कुणीही बलात्कार केला नाही. कारण त्यांच्यासाठी आणि इतर अनेक भारतीयांसाठी ती कुणीही नव्हती,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे

हाथरस प्रकरणाला आणखी एक ट्विस्ट?

दरम्यान,देशाला हादरवून सोडणाऱ्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडितेवर बलात्कार झाला नसल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. त्यावरून उत्तर प्रदेश पोलीस व योगी सरकार वादात सापडलं होतं. याचं संदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.