कुमारांच्या कुस्ती स्पर्धेत भारताला तीन पदके

नवी दिल्ली – भारताला इस्तोनियात झालेल्या कुमारांच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत तीनच पदकांवर समाधान मानावे लागले. भारताच्या दीपकने फ्रीस्टाईलमधील 86 किलो गटात सुवर्णपदक जिंकले तर विकीने 92 किलो गटात ब्रॉंझपदक पटकाविले.

ग्रीकोरोमन विभागातील 77 किलो गटात सजन भनवालने ब्रॉंझपदक मिळविले. सचिन राणाला 60 किलो गटातील रेपिचेज लढतीत जॉर्जियाच्या दिएगो छकवादेझने पराभूत केले. ही लढत त्याने 5-1 अशा फरकाने जिंकली. भारताच्या महिला खेळाडूंना या स्पर्धेत एकही पदक मिळविता आले नाही. गेल्या तीन वर्षांत प्रथमच त्यांची पाटी कोरी राहिली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)