राज्य स्पर्धेत पूर्वा बर्वेला अजिंक्‍यपद

परभणी : येथे झालेल्या राज्य मानांकन बॅडमिंटन स्पर्धेतील महिलांच्या गटात पुण्याची खेळाडू पूर्वा बर्वेने अजिंक्‍यपद पटकाविले. अव्वल मानांकित पूर्वाने अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित नेहा पंडितचा 21-11, 21-19 असा रंगतदार लढतीनंतर पराभव केला.

नेहा ही पूर्वापेक्षा खूप वरिष्ठ खेळाडू आहे. तरीही तिने त्याचे दडपण न घेता खेळ करीत सामना जिंकला. तिने ड्रॉपशॉट्‌सचा बहारदार खेळ केला. उपांत्य फेरीत तिने मृण्मयी सावजी हिला 21-18, 21-9 असे पराभूत केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वरूण व पूर्वा हे दोन्ही खेळाडू माजी ऑलिंपिकपटू निखिल कानेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. कानेटकर यांनी सांगितले की, वरूणने कुमारांच्या गटात आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली कामगिरी अपेक्षा उंचावणारी आहे. त्याच्याकडे वरिष्ठ गटात चांगले यश मिळविण्याची क्षमता आहे. त्यासाठी अधिकाधिक मेहनत केली पाहिजे. तसेच त्याने शारीरिक व मानसिक तंदुरूस्तीवरही लक्ष दिले पाहिजे. पूर्वाने नेहावर मिळविलेला विजय कौतुकास्पद आहे. नेहाला महिला गटातील सामन्यांचा भरपूर अनुभव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)