ब्रिस्बेन : फिरकी गोलंदाज पूनम यादवच्या अचूक व प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने टी-२० विश्वचषक पूर्वीच्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजचा २ धावांनी पराभव करत विजय मिळवला.
A thrilling victory for India in Brisbane – they win their first warm-up by two runs. #INDvWI | #T20WorldCup pic.twitter.com/juzmd3jRdC
— T20 World Cup (@T20WorldCup) February 18, 2020
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना शिखा पांडेच्या नाबाद २४, दीप्ती शर्माच्या २१ धावांच्या जोरावर २० षटकांत ८ बाद १०७ धावा केल्या होत्या. विंडीजकडून अनिसा महंमद आणि काॅनेलने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करणा-या विंडीजला २० षटकांत ७ बाद १०५ धावांत रोखत भारतीय संघाने अवघ्या २ धावांनी विजय मिळवला. विंडीजकडून ली-अॅन किर्बीने ४२, हायली मॅथ्यूजने २५ धावांची खेळी केली पण त्या संघास विजय मिळवून देण्यास अपयशी ठरल्या. भारताकडून पूनम यादवने सर्वाधिक ३ तर हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा आणि शिखा पांडे यांनी प्रत्येकी १ विकेट घेत संघास विजय मिळवून दिला.