पार्ल – भारत व यजमान दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आता एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. कसोटी मालिकेत भारतीय संघाला 2-1 असा मालिका पराभव पत्करावा लागला होता. आता मर्यादित षटकांची मालिका जिंकत भारतीय संघ प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करणार आहे.
भारतीय संघाला आजवर दक्षिण आफ्रिका दौऱ्यात फारसे यश मिळालेले नाही. त्यातच आता कसोटी मालिकाही गमावली असल्याने किमान एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकत यशस्वी होत मायदेशी परतण्यासाठी खेळाडूंना क्षमतेपेक्षा जास्त सरस खेळ करावा लागणार आहे.
एकदिवसीय मालिकेचे नेतृत्व खरेतर रोहित शर्माकडे दिले गेले होते. मात्र, दुखापतीने त्याने या मालिकेतून माघार घेतल्यामुळे संघाचे नेतृत्व लोकेश राहुल करणार आहे.
एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना – 19 जानेवारी, पार्ल
दुसरा सामना – 21 जानेवारी, पार्ल
तिसरा सामना – 23 जानेवारी, केपटाऊन