नवी दिल्ली – देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. गेल्या 24 तासात देशात 2 लाख 51 हजार 209 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 627 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान 3 लाख 47 हजार 443 लोक करोनामुक्त झाले आहेत.
India reports 2,51,209 new #COVID19 cases, 627 deaths and 3,47,443 recoveries in the last 24 hours
Active case: 21,05,611 (5.18%)
Daily positivity rate: 15.88%Total Vaccination : 1,64,44,73,216 pic.twitter.com/vz7DhaPdvz
— ANI (@ANI) January 28, 2022
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशात 21 लाख 5 हजार 611 करोना रुग्ण उपचार घेत आहेत. .देशातला रुग्ण बाधित आढळण्याचा दैनंदिन दर आता 15.88 टक्क्यांवर पोहोचला आहे.