मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटची मोस्ट अवेटेड फिल्म ‘गंगुबाई काठियावाडी’ची नवीन रिलीज डेट जाहीर झाली आहे. करोनाच्या साथीदरम्यान “गंगुबाई…’ला वारंवार पुढे ढकलले गेले होते. यापूर्वी रिलीज डेट 11 सप्टेंबर 2020 रोजी होती. मात्र, काही कारणाने ही तारीख पुढे ढकलली गेली.
त्यानंतर 6 जानेवारीला हा सिनेमा रिलीज होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, ही तारीख नंतर बदलण्यात आली आणि आता 25 फेब्रुवारी 2022 रोजी ‘गंगुबाई…’ मोठ्या पडद्यावर रिलीज होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
View this post on Instagram
संजय लीला भन्साळींच्या प्रॉडक्शन हाऊसने ट्विटरवर एक पोस्ट करून या नवीन रिलीज डेटची अधिकृत माहिती दिली आहे. त्यामुळे आता येत्या 25 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गंगुबाईच्या जीवनावरील हा सिनेमा प्रसिद्ध लेखक हुसैन जैदीचे पुस्तक ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ मधील एका प्रकरणातून आकाराला आले आहे.
1960 च्या दशकात मुंबईतील कामाठीपुरा भागातील भागात गंगुबाईचा मोठा दबदबा होता. भन्साळींच्या प्रॉडक्शन हाउसने केलेल्या ट्विटला एक समर्पक कॅप्शनही देण्यात आली आहे. ‘शक्ती, साहस आणि निडरतेसह यांचा उदय बघा’ असे या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.