GDP Data for 2nd Quarter Of 2023-24: सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी जाहीर केली आहे. चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीच्या जुलै ते सप्टेंबर दरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.6 टक्के विकास दर जीडीपी राहिला आहे. एप्रिल ते जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी 7.8 टक्के होता. तर गेल्या आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी 6.3 टक्के होता. दरम्यान, आरबीआयने दुसऱ्या तिमाहीत जीडीपी 6.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.