India Q3 GDP : जगातील अनेक देशांमध्ये मंदीची स्थिती असताना भारतीय अर्थव्यवस्था चमकदार कामगिरी करत आहे. सांख्यिकी मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत भारताचा जीडीपी सकल देशांतर्गत उत्पादन ( Gross Domestic Product) 8.4 टक्के दराने वाढला आहे.
Indian economy grows by 8.4 pc in October-December 2023 against 4.3 pc a year ago: Govt data
— Press Trust of India (@PTI_News) February 29, 2024
आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत GDP 40.35 लाख कोटी रुपये होता, जो चालू आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत वाढून 43.72 लाख कोटी रुपये झाला आहे.
Indian economy to grow at 7.6 per cent in 2023-24 compared to revised estimate of 7 per cent for FY23: Govt data
— Press Trust of India (@PTI_News) February 29, 2024
उत्पादन क्षेत्राची दुहेरी अंकांनी वाढ (11.6%) झाली आहे तर, बांधकाम क्षेत्र 9.5 टक्क्यांनी वाढले आहे. या दोन क्षेत्रांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे जीडीपीने 8.4 टक्के वाढ नोंदवली. या आर्थिक वर्षात विकास दर 7.6 टक्के राहण्याचा अंदाज आहे, जो गेल्या आर्थिक वर्षात (2022-23) 7 टक्के होता. वृत्तसंस्थेनुसार, अर्थव्यवस्थेतील ही तेजी उत्पादन, खाणकाम आणि उत्खनन आणि बांधकाम क्षेत्रातील चांगल्या कामगिरीमुळे आली आहे. जीडीपीतील ही वाढ अपेक्षेपेक्षा चांगली असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.