Hockey Team India Tour Of South Africa (India vs France) : चार देशांच्या हॉकी स्पर्धेत बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात फ्रान्सने अखेरच्या क्षणांमध्ये गोल नोंदवत भारताला 2-2 अशी बरोबरी साधण्यास भाग पाडले.
सामन्यात हाफ टाईमपर्यंत भारतीय संघ 2-0 ने आघाडीवर होता, मात्र 37व्या मिनिटाला टिमोथी क्लेमेंट आणि सामना संपण्याच्या एक मिनिट अगोदर बी गॅस्पार्ड याने गोल केल्याने भारताच्या सामना जिंकण्याच्या आशा धुळीस मिळाल्या. तत्पूर्वी, भारताकडून मनदीप सिंगने आठव्या मिनिटाला आणि अमित रोहिदासने 19व्या मिनिटाला गोल केले.
It’s a Draw🤝
The final whistle blows, and it’s a hard-fought draw at 2-2.
Full-time:
India 🇮🇳 2 – France 🇫🇷 2Goal Scorers:
8′ Mandeep
19′ Amit37′ Timothee Clement
59′ B Gaspard#SATour #HockeyIndia #IndiaKaGame
.
.
.
.@CMO_Odisha @sports_odisha @Media_SAI @IndiaSports pic.twitter.com/ot5sXBnSBE— Hockey India (@TheHockeyIndia) January 24, 2024
दरम्यान, स्पर्धेतील याआधीच्या पहिल्या सामन्यात भारताने फ्रान्सचा 4-0 असा पराभव केला होता. स्पर्धेत आता भारतीय हाॅकी संघ 26 जानेवारीला यजमान दक्षिण आफ्रिकेशी आणि 28 जानेवारीला जगातील नंबर वन नेदरलँडशी खेळणार आहे.