तिसऱ्या टी-२० सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे भारताचा झाला पराभव

भारत आणि इंग्लड संघात टी-२० मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी पार पडला. या सामन्यात इंग्लडने ८ गडी राखून भारतावर मात केली. त्यामुळे पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत इंग्लडने २-१ या फरकाने आघाडी घेतली. परंतु या सामन्यात भारतीय संघातील काही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. मात्र बऱ्यापैकी भारतीय खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे भारतीय संघाचा पराभव झाला. आता भारतीय संघाला ही मालिका जिंकण्यासाठी उर्वरीत दोन ही सामन्यात विजय मिळवने आवश्यक आहे.

तत्पुर्वी तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवेल अशी सर्व चाहत्यांना आशा होती. मात्र भारतीय संघातील बऱ्याच खेळाडूंनी केलेल्या खराब कामगिरीचा फटका भारतीय संघाला बसला. त्यामुळे आज आपण या लेखात कोणत्या तीन कारणामुळे भारतीय संघाने तिसरा सामना गमावला ते जाणून घेणार आहोत.
भारतीय संघातील वरच्या फळीतील अपयश:
भारतीय संघाने जेव्हा फलंदाजीला सुरुवात केली, तेव्हा भारतीय संघ दबावात असलेला दिसून येत होता. केएल राहुल सलग तिसऱ्या डावात फ्लॉप ठरला. त्याचबरोबर रोहित शर्मा आणि इशान किशन हे दोघे स्वस्तात परतले. वरच्या फळीतील हे तीन मुख्य फलंदाज लवकर बाद झाल्याने पावरप्लेच्या षटकांत भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. याचाच परिणाम म्हणून भारतीय संघाला इंग्लडसाठी मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
मार्क वुडची दमदार गोलंदाजी:
मार्क वुडने सुरुवातीलाच आपल्या दमदार गोलंदाजीचे प्रदर्शन करताना वेगवान आणि उसळी घेणाऱ्या चेंडूने भारतीय फलंदाजांना जाळ्यात अडकवले. त्यामुळे भारतीय संघाचे फलंदाज बाद झाले. आपल्या कोट्यातील पहिल्या तीन षटकांत त्याने धावा सुद्धा खर्च केल्या नाहीत. त्याने भारतीय संघाचे तीन फलंदाज बाद करताना धावांवर ही अंकुश लावला.
जोस बटलरची आक्रमक खेळी:
इंग्लड संघाची पहिली विकेट लवकर पडली होती. मात्र जोस बटलरने आपल्या संघाचा डाव एका बाजूने सावरताना खेळपट्टीवर टिकून राहीला. जोस बटलरने आकर्षक फलंदाजी करताना आपल्या संघावर दबाव पडू दिला नाही. त्याचबरोबर सातत्याने धावफलक हलता ठेवला. बटलरने ५२ चेंडूत ४ षटकार आणि ५चौकार लगावत आक्रमक खेळी साकारताना नाबाद ८३ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आणि इंग्लडच्या विजयाचा मार्ग सोप्पा झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.