विश्‍वकरंडक हॉकीसाठी भारत इच्छुक

 लुसान:-विश्‍वकरंडक हॉकी 2023 च्या स्पर्धेच्या आयोजनासाठी भारत इच्छुक असून यासाठी भारतीय हॉकी महासंघ बोली लावणार आहे. यापूर्वी तीन वेळा भारताला हा मान मिळाला होता.

2023 साली ही स्पर्धा 13 ते 29 जानेवारीला घेण्यासाठी भारतीय हॉकी महासंघ बोली लावणार आहे. भारताव्यतिरिक्त बेल्जियम. जर्मनी, मलेशिया, स्पेन, नेदरलॅंड्‌स या देशांनीदेखील या यजमानपदाच्या शर्यतीत भाग घेतला आहे.

पुरुषांच्या स्पर्धेसाठी भारतासह बेल्जियम आणि मलेशियाने तर महिलांच्या स्पर्धेच्या आयोजनासाठी जर्मनी, स्पेन, मलेशिया, न्यूझीलंड आणि नेदरलॅंड्‌स या देशांनी प्रस्ताव सादर केला आहे.

येत्या 6 नोव्हेंबरला महासंघाची समिती या प्रस्तावांचा अभ्यास करुन एक अहवाल देणार असून त्यानंतरच संबंधित देशांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली
जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.