बॉलिवुडमध्ये लवकरच डेब्यू करणार सुरभि ज्योति

“नागिन 3’मध्ये बेलाची दमदार भूमिका साकारत स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सुरभि ज्योति मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाली आहे. सुरभि लवकरच बॉलिवुडमध्ये डेब्यू करणार असून “सोनम गुप्ता बेवफा है’ असे चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात सुरभिच्या ऑपोजिट जस्सी गिल काम करणार आहे.

सुरभिने “नागिन-3’शिवाय अनेक पॉप्युलर टीव्ही शोजमध्ये काम केलेले आहे. तिने पंजाबी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. मात्र, बॉलीवूडमध्ये आता ती आपले नशीब आजमाविणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी सुरभिने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. तसेच ती आपल्या डेब्यूबाबत खूपच उत्साहित आहे.

सुरभिने छोट्या पडद्यावरील दुनियेत खुपच प्रसिद्धी मिळविलेली आहे. आता ती बॉलिवूडमध्ये आपली छाप निर्माण करण्यासाठी सज्ज होत आहे. दरम्यान, “सोनम गुप्ता बेवफा है’ या चित्रपट रोमांटिक कॉमिडी असणार असून नीलू कोहली आणि ब्रजेंद्र काला मुख्य भूमिका साकारत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.