मसूद अझहरवरील बंदीचा विषय भारताकडून चीनकडे उपस्थित

नवी दिल्ली/ बिजींग – जैश ए मोहंम्मदचा म्होरक्‍या मसूद अझहरबाबतचा विषय आज चीन दौऱ्यावर असलेले विदेश सचिव विजय गोखले यांनी चीनचे विदेश मंत्री वॅंग वी यांच्याकडे उपस्थित केला. या संदर्भात दोन्ही देशांनी एकमेकांना जाणवणाऱ्या मुद्दयांप्रती संवेदनशीलता दाखवली पाहिजे, असे गोखले यांनी वी यांना सांगितले. जैश ए मोहंम्मद ही संघटना आणि त्या संघटनेचा म्होरक्‍या मसूद अझहरच्या दहशतवादी कारवायांबाबतचे सर्व पुरावे भारताने चीनला दिले आहेत, असे विदेश मंत्रालयाचे प्रवक्‍ते रवीश कुमार यांनी सांगितले. मसूद अझहरला काळ्या यादीत टाकण्याचा मुद्दा विदेश सचिवांच्या दौऱ्यादरम्यान उपस्थित केला गेला का, असे पत्रकारांनी विचारल्यावर कुमार यांनी ही माहिती दिली.
जैश ए मोहंम्मद आणि मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याबाबतचा आता 1267 नियमाची कमिटी आणि अन्य संयुक्‍त राष्ट्राच्या अन्य अधिकृत संस्थांनी निर्णय घ्यायचा आहे. भारतातल्या निरपराधांवर हल्ले करणाऱ्या या दहशतवादी संघटनेला कठोर शिक्षा करण्यासाठी भारताकडून सर्व शक्‍य ते प्रयत्न केले जात आहेत, असेही रवीश कुमार यांनी सांगितले.

वी यांच्या व्यतिरिक्‍त गोखले यांनी चीनमधील अनेक नेते आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेतही अझहरबाबतचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, असे कुमार यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)