नवी दिल्ली – अमेरिका करोना विषाणूच्या विळख्यात अडकली आहे. यावर औषध सापडले तरीही उपचारांमध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्विन या गोळया प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी विनंती यानंतर भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्विन गोळयांच्या निर्यातीवरील निर्बंध हटवले नाहीत तर, जशास तसे उत्तर देण्यात येईल, अशी धमकीवजा इशारा दिला होता. यावर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले चांगले मित्र असल्याचे सांगतात. या अनुषंगाने राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मैत्री म्हणजे प्रत्युत्तर देणे नसते. करोनासारख्या संकटाच्या काळात भारताने इतर देशांना जरूर मदत केली पाहिजे. मात्र, जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेली औषधे भारतात पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
‘मित्रों’ में प्रतिशोध की भावना? भारत को सभी देशों की सहायता के लिए तैयार रहना चाहिए लेकिन सबसे पहले जान बचाने की सभी दवाइयाँ और उपकरण अपने देश के कोने-कोने तक पहुँचना अनिवार्य है। pic.twitter.com/RMk8lHHsO1
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 7, 2020
दरम्यान, करोनामुळे हायड्रोक्सीक्लोरोक्विन या औषधाची मागणी वाढली आहे. मात्र भारताने या औषधाच्या निर्यातीवर याआधीच बंदी घातली होती. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सीक्लोरोक्विन या औषधाच्या पुरवठयावरुन इशारा दिल्याने मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने व्हिटॅमिन बी 1 आणि बी 12 यासह 24 औषधांच्या निर्यातीवरील निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळे आता ही औषधे निर्यात केली जातील. मात्र पॅरासिटामॉल आणि त्यापासून बनविलेल्या इतर औषधांवर निर्यातीवरील निर्बंध पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.