मुंबई – जगभरात करोनाने घेतलेल्या बळींची संख्या 70 हजारांवर पोहचली आहे. त्या विषाणूमुळे जीव गमवाव्या लागलेल्यांत एकट्या युरोप खंडातील हजारांहून अधिक रूग्ण आहेत. सर्वप्रथम चीनमध्ये करोनाचा उद्रेक झाला. त्या देशाला ठप्प करणाऱ्या करोनाने आता जवळपास संपूर्ण जगालाच विळखा घातल्याचे चित्र आहे. जगभरातील 209 देश आणि प्रदेशांमध्ये त्या विषाणूचा फैलाव झाला आहे.यातच भारतातही लॉकडाउन आहे. त्यातच आज संपूर्ण जगभरात जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरसचा सामना करणाऱ्या देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट
फिर मुस्कुराएगा इंडिया…
फिर जीत जाएगा इंडिया…
India will fight. India will win!
Good initiative by our film fraternity. https://t.co/utUGm9ObhI
— Narendra Modi (@narendramodi) April 7, 2020
‘आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपण फक्त आपल्या एकमेकांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करुया नको, तर कोरोनाविरुद्धच्या लढाईचे नेतृत्व करण्याऱ्या त्या डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचेही आभार व्यक्त करूया.” याचबरोबर, नरेंद्र मोदी म्हणाले, “जागतिक आरोग्य दिनानिमित्त आपण खात्रीपूर्वक सोशल डिस्टंसिंगचे पालन करूया. ज्यामुळे आपल्यासह दुसऱ्याच्या जीवाची सुरक्षा करता येईल. आशा आहे की हे दिवस आपल्याला वर्षभरासाठी व्यक्तीगत फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यास प्रेरित करतील, जे आपल्या आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होईल.”