नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने न्यूझीलंडविरूध्दच्या आगामी कसोटी मालिकेत तो खेळू शकणार नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.
India all-rounder Hardik Pandya's injury-enforced wait on the sidelines continues.#NZvINDhttps://t.co/nskM517Pwu
— ICC (@ICC) February 1, 2020
आशिया चषकादरम्यान हार्दिक पांड्याच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यानंतर काही महत्वाच्या मालिकेतील सामन्यात तो खेळला. मात्र २०१९ साली दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या मालिकेत हार्दिकच्या पाठीच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले त्यानंतर आॅक्टोबरमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि हार्दिक संघाबाहेर गेला, तो परत संघात पुनरागमन करूच शकला नाही.
दरम्यान, भारतीय संघाने नुकतीच न्यूझीलंडविरूध्दची टी-२० मालिका ५-० ने जिंकली आहे. त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. त्यानंतर कसोटी मालिकेस २१ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे.