इंदापूर । ऊसतोड मजुरांचे असलेले आजार मोफत तपासणीमुळे लपून राहणार नाहीत- नगराध्यक्षा शहा

इंदापूर शहरातील ढोकरे वस्तीवरील 81 मजुरांची मोफत तपासणी

इंदापूर (प्रतिनिधी) – राज्यात व देशपातळीवर कोरोना चा संसर्ग वाढत असताना, शंकराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून ऊसतोड मजुरांना, आरोग्याची काळजी साठी मोफत तपासणी औषधोपचार केला जात आहे. हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून, या मोफत तपासणी मुळे कोणताही आजार मजुरांचे लपून राहणार नाहीत. अशी माहिती इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी दिली.

इंदापूर शहरातील कै.शंकराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने (गुरुवार 25 रोजी) इंदापूर शहरानजीक असलेल्या ढोकरे वस्ती वरील ऊसतोड मजुरांची मोफत तपासणी, इंदापूर शहराच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते प्रारंभ करून करण्यात आली.

यावेळी शहा बोलत होत्या. लायन्स क्लब अध्यक्षा सायरा आतार, तुषार रंजंणकर,दीपक जगताप, कारखान्याचे कर्मचारी अशोक भोंगळे,महेश व्यवहारे पांडुरंग बोंगाणे,भारत गडदे,अनिल व्यवहारे, डॉक्टर वर्षा बोराटे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण किरण खंडागळे संजय शेलार यांच्यासह आरोग्य विभागाची टीम उपस्थित होती.

पुढे माहिती देताना शहा म्हणाल्या की, खऱ्या अर्थाने मजूरांना छोटे-छोटे आजार असतात.कोणाला कॅल्शियम कमी असते. तर कुणाला रक्त कमी असते, अशा आजारांवर मोफत औषधोपचार या ट्रस्टच्या माध्यमातून केला जात असल्यामुळे, या मोफत तपासणी बरोबरच औषध उपचारांबरोबरच आरोग्य कसे आपले सुस्थितीत ठेवता येईल, याची सर्व माहिती या प्रश्नाच्या माध्यमातून मजुरांना उपलब्ध होत असल्यामुळे,मजुरांना पुढे होणारे जर्जर आजार होणार आहेत अशीही माहिती शहा यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.