तेल अविव – इस्रायलच्या सैन्याने आज सीरियातील काही ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ला केला. सीरियातून इस्रायलमधील गोलान हाईटवर रॉकेट हल्ला झाल्यानंतर इस्रायलकडून हे प्रत्युत्तर दिले गेले.
इस्रायली हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी सीरियातून उत्तर इस्रायलच्या दिशेने सोडलेले दोन लढाऊ विमाने पाडली. सीरियाच्या हद्दीतून उत्तर इस्रायलच्या केशेत आणि कात्झरिनच्या या भागांमध्ये प्रवेश केल्यानंतर एक “शत्रु विमान” पाडण्यात आले. त्याच्या एका तासानंतर,पूर्वेकडून इस्रायली प्रदेशाकडे जात असताना दुसरे विमान अडवण्यात आले, असेही इस्रायली फौजांनी म्हटले आहे.
इराकमधील इस्लामिक रेझिस्टन्सने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि हा हल्ला गाझाच्या समर्थनार्थ असल्याचे म्हटले. आहे. इराक आणि सीरियामधील इराणी-समर्थित कट्टरपंथी शिया मिलिशियाचा हा लष्करी गट कटाइब हिजबुल्लाह, हरकत हिजबुल्लाह अल-नुजाबा आणि कताइब सय्यद अल-शुहादा हे गट एकत्र केल्यामुळे बनलेला आहे.
इराणचे समर्थन असलेल्या गटांकडून युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलवर हा तिसरा ड्रोन हल्ला केला गेला होता. यामध्ये गोलान हाईटवर गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्याचाहीसमावेश आहे.