IND vs SA 2nd Test & Virat kohli : केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीने मैदानावर वर्चस्व गाजवले. क्षेत्ररक्षणापासून फलंदाजीपर्यंत भारताच्या माजी कर्णधाराची चमक पाहायला मिळाली. आफ्रिकन संघाला दिवसभरात दोनदा फलंदाजी करावी लागली. आफ्रिकन संघ फलंदाजी करत असताना कोहलीने दोन्ही डावात क्षेत्ररक्षणावर वर्चस्व गाजवले. विराटने दुसऱ्या डावात पुन्हा एकदा आपल्या खिलाडूवृत्तीने प्रेक्षकांची मने जिंकली.
खरं तर, जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर दुसऱ्या डावात बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतत होता, तेव्हा कोहली त्याच्याजवळ गेला आणि त्याची गळाभेट (मिठी) घेतली. कारण एल्गरच्या कारकिर्दीतील ही शेवटची खेळी होती. मुकेश कुमारने त्याला विराटकरवी झेलबाद केले. एल्गरने कारकिर्दीतील शेवटच्या डावात 12 धावा केल्या.
#MukeshKumar‘s nibbler gets #DeanElgar on his final test!
Will #TeamIndia keep racking up wickets before the day’s play?
Tune in to #SAvIND 2nd Test
LIVE NOW | Star Sports Network#Cricket pic.twitter.com/qftk1SpI8D— Star Sports (@StarSportsIndia) January 3, 2024
तसेच डीन एल्गर बाद झाल्यावर भारतीय चाहत्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली मात्र, त्यांना भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शांत राहण्याची खूण केली. एल्गर बाद झाल्यावर आनंद व्यक्त न करता त्याचे टाळ्या वाजवून अभिनंदन करा असे कोहलीने चाहत्यांना सुचवले.
Mutual respect takes center stage as #TeamIndia players bid a fitting farewell to the South African captain! 👏🏻🙌🏻
Thank you for the memories, #DeanElgar! 🤌🏻
Tune-in to Day 2 of #SAvIND 2nd Test
Tomorrow, 12:30 PM | Star Sports Network#Cricket pic.twitter.com/7Hy5Zezc7u— Star Sports (@StarSportsIndia) January 3, 2024
इतकेच नव्हे विकेट घेतल्यानंतर भारतीय गोलंदाज मुकेश कुमार आनंद साजरा करत होता, मात्र विराटने एल्गरला परफेक्ट फेअरवेल मिळेल याची काळजी घेतली. एल्गर या सामन्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे त्यामुळे त्याच्या कारकीर्दीचे कौतुक करा असेच कोहलीने जणू चाहत्यांना खुणावले. कोहलीच्या या कृतीचे कौतुक केवळ भारतीय चाहत्यांनीच नव्हे दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांनीही कौतुक केले.