IND vs SA 2nd ODI Toss & Playing 11 update : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (19 डिसेंबर) खेळवला जात आहे. गकबेराह येथील सेंट जॉर्ज पार्क येथे दोन्ही संघ आमनेसामने आहेत. जोहान्सबर्गमधील पहिला सामना भारताने आठ गडी राखून जिंकला होता. दुसरा सामना जिंकल्यास मालिकेत अजिंक्य आघाडी घेईल.
या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे डावखुरा फलंदाज रिंकू सिंगने भारताकडून पदार्पण केले आहे. श्रेयस अय्यर कसोटी संघात सामील झाला आहे. तो या सामन्यात खेळत नाही.
IND vs SA Live Score : दोन्ही संघाचे Playing 11 खालीलप्रमाणे…
दक्षिण आफ्रिका : टोनी डी जॉर्गी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स, बुरेन हेंड्रिक्स.
🚨 Toss & Team News
South Africa elected to bowl and here’s India’s Playing XI for the second ODI 🔽
Follow the Match ▶️ https://t.co/p5r3iTdngR#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/hB9h1XUBrm
— BCCI (@BCCI) December 19, 2023
भारत : केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), ऋतुराज गायकवाड़, साई सुदर्शन, तिलक वर्मा, संजू सैमसन, रिंकू सिंह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार।
भारताचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंगला पदार्पणाची संधी मिळाली आहे. नाणेफेकीपूर्वी कुलदीप यादवने त्याला वनडे कॅप दिली. त्याने याआधी टी-20 मध्ये पदार्पण केले आहे.