नवी दिल्ली – राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे ( Karani sena ) प्रमुख सुखदेव सिंग गोगामेडी ( Sukhdev singh gogamedi ) यांच्या हत्येप्रकरणी जयपूर पोलिसांनी ( jaypur police ) हरियाणातील महेंद्रगड येथील रहिवासी रामवीर सिंग ( Ramvir singh ) याला अटक केली आहे.तो या हत्याप्रकरणातील प्रमुख संशयित आहे असे जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी सांगितले.
राजस्थानमधील जयपूरमध्ये (Jaipur News) राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे (Karani Sena) अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी (Sukhadev Singh) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोळीबार आणि खुनाच्या या घटनेनंतर शहरभरातील पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींचा शोध सुरू केला होता.(Karani sena news)
5 डिसेंबर रोजी नितीन फौजी आणि रोहित राठोड या दोन नेमबाजांनी सुखदेव सिंग गोगामेडी यांची श्याम नगर येथील निवासस्थानी अंदाधुंद गोळीबार करून हत्या केली होती. यातील नितीन फौजीसाठी जयपूरमध्ये आश्रय देण्याची सोय रामवीर सिंग याने केली होती, असे जयपूर पोलीस आयुक्तांनी सांगितले. ( karani sena )
अतिरिक्त पोलीस आयुक्त कैलाश चंद्र बिश्नोई म्हणाले, रोपी रामवीर हा शूटर नितीन फौजीचा जवळचा मित्र आहे. रामवीर आणि नितीन फौजी शेजारच्या गावात राहत होते आणि दोघे महेंद्रगड येथील शाळेत १२ वीत एकत्र शिकले होते.१२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर नितीन फौजी सैन्यात दाखल झाला होता अशी माहितीही त्यांनी दिली. या हत्याकांडातील तिसरा हल्लेखोर नवीन शेखावत हा गोगामेडी यांच्या निवासस्थानी पोलिसांशी झालेल्या गोळीबारात ठार झाला. गोगामेडीचा एक सुरक्षा रक्षक गोळीबारात जखमी झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.