R Ashiwn scripts history, becomes 1st Indian bowler to achieve remarkable feat in World Test Championship : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये खेळला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे भारतीय फिरकीपटूंच्या नावावर होता. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा जोडीने पहिल्या डावात 6 बळी घेत इंग्लंडचा डाव 246 वर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
यासह रविचंद्रन अश्विनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. अश्विन (WTC) डब्ल्यूटीसीमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने डब्ल्यूटीसीमध्ये 150 विकेट पूर्ण केल्या आहेत. दरम्यान, त्याने डब्ल्यूटीसीमध्ये 140 विकेट्स घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला मागे टाकले आहे.
अश्विनपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांनी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स 169 विकेटसह पहिल्या क्रमांकावर तर ऑस्ट्रेलियाचाच फिरकीपटू नॅथन लायन 169 बळीसह तिसऱ्या क्रमाकांवर आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट्स…
पॅट कमिन्स : 40* सामने 169 बळी
नॅथन लायन : 41* सामने 169 बळी
आर अश्विन : 31* सामने 151 बळी
मिशेल स्टार्क : 36* सामने 140 बळी
स्टुअर्ट ब्रॉड : 33 सामने 134 बळी
कगिसो रबाडा : 25 सामने 115 बळी
IND vs ENG 1st Test : अश्विन-जडेजा जोडीला तोड नाही! भारत-इंग्लंड कसोटीदरम्यान केला मोठा पराक्रम…
फक्त 7 विकेट्स दूर…
अश्विन आता कसोटी कारकिर्दीतील 500 विकेट्सपासून फक्त 7 विकेट्स दूर आहे. आजच्या सामन्यात त्याने 3 बळी घेतले. अश्विनने बेन डकेटची शिकार करून इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर त्याने झॅक क्रॉली आणि मार्क वुडचे बळी घेतले.