पुणे – करोनानंतर कौटुंबिक सहली, मित्रांचे ग्रुप, हनिमून ट्रॅव्हल यामुळे पुण्यातून पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही वाढ महिन्याला 70 टक्के इतकी असून, स्थानिक पर्यटनात 300 टक्क्यांनी, तर परदेशी प्रवासात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
उत्सव आणि हिवाळ्याच्या हंगामामुळे कोरोनानंतर 55 टक्के पर्यटन पूर्वपदावर येत आहे, अशी माहिती थॉमस कुक इंडियाचे कंट्री हेड आणि हॉलिडेज, माइस, व्हिसा विभागांचे प्रमुख राजीव काळे यांनी दिली. यावेळी वेस्ट इंडिया सेल्स हेड मीनल हाते, रेस्ट ऑफ महाराष्ट्र सेल्स हेड श्रेयस खापरे, क्वालिटी कंट्रोल मॅनेजर मनीष कबरे, युरोप टूर मॅनेजर मिलिंद गायकवाड, इम्रान चौहान आदी उपस्थित होते.
राजीव काळे म्हणाले की, पुणे ही थॉमस कुकसाठी महत्वाची बाजारपेठ ठरली आहे. मालदिव्ह्ज, स्वित्झर्लंड, फ्रान्स, रशिया, तुर्की आणि इजिप्त या देशांमधील पर्यटनाला जास्त मागणी आहे. शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यांची संख्या पुण्यातून वाढताना दिसत आहे आणि क्वारंटाइन पॅकेजेससह थॉमस कुक इंडियाने अमेरिका व कॅनडाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी उत्तम प्रकारे सेवा दिली आहे.
थॉमस कुक इंडियाच्या विस्तृत जाळ्यामध्ये पुण्यातील चार मालकीची/ फ्रान्चायझी आउटलेट्स (भांडारकर रोड, पुणे कॅप, विमाननगर आणि औंध) आणि महाराष्ट्रात मुंबई व पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि अहमदनगर या महत्त्वाच्या टिअर 2-3 शहरांमध्ये एकूण 25 आउटलेट्स आहेत. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 77% व्यक्तींना 2021 या वर्षातच पर्यटन करण्याची इच्छा आहे.
यामध्ये 62% व्यक्तींनी परदेशी ठिकाणांना पसंत केले आहे;, तर 78% व्यक्तींनी स्थानिक पर्यटनाला प्राधान्य दिले आहे; काश्मीर, लेह-लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड; तसेच ईशान्य भारत, राजस्थान आणि अंदमानसाठी वाढती मागणी दिसून येत आहे.