पीएनजी ज्वेलर्सतर्फे अनोखी दिवाळी मोहीम

पुणे, – उत्सवकाळ सुरू होत असताना आघाडीचा ज्वेलरी ब्रॅंड पीएनजी ज्वेलर्स तर्फे अनोखी दिवाळी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम ही 7 ऑक्‍टोबर 2021 ते 7 नोव्हेंबर 2021 दरम्यान पीएनजी ज्वेलर्सच्या सर्व स्टोअर्समध्ये सुरू असेल. दरवर्षी उत्सवकाळात 188 वर्षांची परंपरा असलेल्या पीएनजी ज्वेलर्सतर्फे नावीन्यपूर्ण ग्राहककेंद्रित संकल्पना राबविल्या जातात.

या मोहिमेमध्ये सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मिलाफाद्वारे एक नवीन व आकर्षक कल निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. याअंतर्गत इअररिंग्स, नेकलेसेस, पेंडंटस, बॅंगल्स, रिंग्स इत्यादींचे आकर्षक डिझाईन दोन्ही सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या रूपात उपलब्ध असतील. या मोहिमेअंतर्गत पीएनजी ज्वेलर्सतर्फे सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 20 टक्‍क्‍यांपर्यंत तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100 टक्‍क्‍यांपर्यंत सूट मिळू शकते.

पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, महामारीचा आपल्या सर्वांवर झालेल्या विपरीत परिणामानंतर लोकांना आता काहीतरी सकारात्मकता हवी आहे. अनोखी दिवाळी मोहीम हा त्या दृष्टीकोनातून ग्राहकांसाठी काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न आहे.

सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचा मिलाफ हा पारंपरिक आणि समकालीन, आधुनिक शैली आणि जुन्या काळातील आकर्षकता याचे सुंदर मिश्रण आहे. आमच्या मते, हा प्रयत्न ग्राहकांच्या नक्कीच पसंतीस पडेल आणि उपलब्ध डिझाईन्सच्या अखंड श्रेणीतून ग्राहकांना या दागिन्यांच्या मिलाफाचा त्यांच्यासाठी योग्य पर्याय प्राप्त होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.