बॉलिवूडमधील अभिनेत्रींनाही लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य स्त्रियांसारख्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सोनम कपूरनंतर आता कृती खरबंदासुद्धा लॉकडाऊन वाढल्याने अस्वस्थ झाली आहे. कृती आपल्या वाढत्या भुवयामुळे नाराज झाली असून तिने आपली नाराजी थेट सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.
कृती खरबंदाने लिहिले की, बाकी सर्व काही ठीक आहे. पण या भुवयांचे काय करावे! यासोबत विविध इमोजीनंतर तिने “कोविड ब्रॉस’ असे लिहिले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोनम कपूरनेही तिच्या चाहत्यांसमवेत अशीच समस्या शेअर केली होती. तिनेही आपल्या आईब्रो खराब झाल्याचे सांगितले होते.
तथापि, दुसरीकडे शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने तिच्या आईब्रो परफेक्ट असल्याचे सांगत त्या व्यवस्थीत असल्याचे सांगितले होते. यासोबत तिने तिचा एक फोटोही पोस्ट केला होता. दरम्यान, करोना विषाणूमुळे देशासह संपूर्ण जागत लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनदरम्यान कृती तिचा बॉयफ्रेंड पुलकित सम्राटसोबत राहात आहे. कृती म्हणाली होती, रहदारी टाळण्यासाठी आम्ही एकाच ठिकाणी राहण्याचे निश्चित केले होते. पण तो (पुलकित) माझ्यासोबत असल्याने मी आभारी आहे.