लाहोर : जगभरात एकीकडे कोरोनामुळे सर्वांचे हाल सुरु आहेत. तर तिकडे कोरोनामुळे पाकिस्तानमध्ये जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊनविषयी मोठा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारने ९ मे नंतर देशभरात लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान इमरान खान यांनी राष्ट्रीय समन्वय समितीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. देशात लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उघडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता अशा वेळी देण्यात येत आहे ज्यावेळी देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानमध्ये 9 मार्चपासून देशव्यापी लॉकडाउन जाहीर करण्यात आले. सुरुवातीला पाकिस्तानचे सरकार देशातील आर्थिक परिस्थिती पाहता देशव्यापी लॉकडाऊनच्या बाजूने नव्हती मात्र परिस्थिती बिघडल्यानंतर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले.
देशाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होत आहे. तसेच या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसह मजूर आणि लहान व्यापाऱ्यांच्या जीवनावर विपरित परिणाम झाला आहे त्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येणार असल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. इम्रान म्हणाले की कोरोना साथीच्या आजारात लोकांना अडचणी येत आहेत. ते म्हणाले की, देशाच्या घट्ट अर्थव्यवस्थेत आपण लॉकडाउन अधिक काळ चालू ठेवू शकत नाही.