नागपुर- पोलिसांना फेक कॉल केल्यामुळे तरुणास मारहाण केली आहे. पोलिसांनी मारहाण केल्यामुळे या तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नागपूरमधील हुडकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे नागपूर पोलिसात खळबळ उडाली आहे.
महेश राऊत, वया 35 असे आत्महत्या केलेल्या तरुणाने नाव आहे. महेशच्या परिसरात भांडण चालू असल्याकारणाने त्याने 100 नंबरवर कॉल केला होता. या कारणामुळे पोलिसांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. सर्वासमोर पोलिसांनी मारहाण केल्यामुळे महेश राऊतने सुसाईड नोट लिहून रात्री आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकाकाडून करण्यात येत आहे.