मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? हा तर पुणेकरांवर अन्याय – मुरलीधर मोहोळ

पुणे – राज्य सरकारची अनलॉकसंबंधीची नवी नियमावली काल (दि. २) जारी करण्यात आली असून, यामध्ये राज्यातील २५ जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच यामध्ये वीकेंड लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यात आला आहे. परंतु पुण्यासह ११ जिल्ह्यांमध्ये लेवल ३ चे नियम कायम ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, २५ जिल्ह्यांपैकी पुणे जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवल्याने नाराजी व्यक्त केली जात असून या मुद्द्यावरुन राजकीय वाद होण्याची चिन्हं दिसत आहेत. याचसंदर्भातील पहिली ठिणगी ही पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या ट्विटमुळे पडली आहे.

“मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? ‘ असं मत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलं आहे. पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी ४ टक्क्यांच्या आत असतानाही लेव्हल ३ चे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकरांवर अन्याय आहे. शहरात सलग महिनाभर पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या खाली नोंदवला गेला आहे. असं मोहोळ यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तर मोहळ पुढे म्हणतात कि, “पालमंत्र्यांसोबतच्या बैठकीत म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीत आपण सतत निर्बंधातील शिथिलतेबाबत मागणी करत आलो आहे. महापौर म्हणून मी शहरातील व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून याबाबत राज्य सरकारने न्याय देण्याच्या भूमिकेत राहावे.’ असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.

दरम्यान, राज्यसरकाने तयार केलेली ही नवी नियमावली उद्यापासून म्हणजेच बुधवार दि. 4 ऑगस्टपासून लागू होणार आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यात सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.