रुग्णालयात उशिरा दाखल होत असल्याचा परिणाम; दिवसभरात 11 जणांचा मृत्यू
पुणे – शहरात बाधितांची संख्या कमी-अधिक प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे रुग्णालयात उशिराने दाखल होत असल्यामुळे अत्यवस्थ बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत बाधितांची संख्या 176 ने वाढली आहे. दरम्यान, करोनामुळे आज 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून असून आतापर्यंत एकूण 361 जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.
करोनाबाधित व्यक्ती वेळेत रुग्णालयात आला तर त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू करता येऊ शकतात. त्यामुळे रुग्ण अत्यवस्थेकडे जाण्याची शक्यता कमी असते. सद्यस्थितीत 2 हजार 399 बाधितांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील नायडूसह त्याअंतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये एकूण 1 हजार 654, ससून रुग्णालयात 163 तर खासगी रुग्णालयात 582 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 176 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 40 जणांना व्हेंटिलेटर आहेत.
136 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. शहरात बाधितांची एकूण संख्या सात हजार 265 वर जावून पोहोचली आहे. आज, दिवसभरात 1 हजार 441 जणांचे नमुने तपासण्यात आले.