नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून देशाची राजधानी दिल्लीतील करोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदली जात आहे. दिल्लीत बुधवारी नव्याने 1 हजार 9 बाधित आढळले. त्यामुळे देशाच्या राजधानीत दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीनंतर पुन्हा हजारहून अधिक बाधितांची नोंद झाली.
याआधी दिल्लीत 10 फेब्रुवारीला 1 हजार 104 बाधित आढळले होते. त्यानंतर दोन महिने ती संख्या घटत गेली. दिल्लीत मंगळवारी 632 बाधितांची नोंद झाली. त्या संख्येत पुढच्या दिवशी 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तेथील बाधित दर 5.70 टक्के इतका आहे. अर्थात, बाधित संख्या वाढत असली तरी बाधितांना रूग्णालयांत दाखल करावे लागण्याचे प्रमाण नगण्य स्वरूपाचे आहे. ती बाब दिल्लीकरांसाठी दिलासादायी आहे.