मुंबई – पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंक म्हणजे पीएमसी बॅंकेवरील निर्बंध रिझर्व्ह बॅंकेकडून 31 डिसेंबर पर्यंत वाढविण्यात आले आहेत. 18 जून रोजी रिझर्व्ह बॅंकेने सेंट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेसला स्मॉल फायनान्स बॅंकेच्या माध्यमातून पीएमसी बॅंकेला अधिग्रहित करण्याची परवानगी दिली आहे.
यासाठी 120 दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे. या बॅंकेवर सप्टेंबर 2019 पासून नियंत्रक नेमण्यात आले असून गेली दोन वर्ष ठेवीदार आपल्या 10 हजार 723 कोटी रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत.
पीएमसी बॅंकेचे अधिग्रहण करण्यासाठी विविध नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन रिझर्व्ह बॅंकेने पीएमसी बॅंकेवरील निर्बंधात वाढ केली आहे.