नगर -काही दिवसांपासून बाजार समितीत कांद्याची आवक कमी होत आहे. सोमवारी मात्र आवक वाढल्याचे दिसून आले. यावेळी लिलावात कांद्याचे भाव थोडे वाढल्याचे दिसून आले. यावेळी एक नंबरच्या कांद्याला सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी झालेल्या लिलावात कांद्याला 1000 ते 1500 रुपयांपर्यंत भाव मिळाला. लिलावासाठी 21 हजार 558 क्विंटल कांद्याची आवक झाली होती.
त्यात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला 1000 ते 1500 रुपये, दोन नंबर कांद्याला 700 ते 1000 रुपये, तीन नंबर कांद्याला 300 ते 700 रुपये आणि चार नंबर कांद्याला 100 ते 300 रूपये बाजारभाव मिळाला. मागील दोन महिन्यांपासून कांद्याला याच पद्धतीने भाव मिळत आहेत.
सध्या कांद्याची आवक जेमतेम आहे. त्यामुळे भाव चांगले मिळतील असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र कांद्याला अजूनही समाधानकारक भाव मिळत नाहीत. आज मात्र लिलावात कांद्याचे भाव काही प्रमाणात वाढल्याचे दिसले. मागील सोमवारी कांद्याला 1400 रुपये भाव मिळाला होता. यावेळी मात्र यामध्ये 100 रुपये वाढ झाल्याचे दिसून आले.