Lok Sabha Election 2024 । पश्चिम बंगालमधील मालदा उत्तर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खगेन मुर्मू यांचा सोशल मीडियावर एक फोटो आणि व्हिडिओ व्हायलर होत आहे. या व्हिडिओत खगेन मुर्मू एका महिलेला प्रचारादरम्यान (चुंबन) किस करतांना दिसत आहे. यासंबंधित सोशल मीडियावर पोस्ट करत तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) भाजपवर टीका केली आहे. या घटनेचे फोटो इंटरनेटवर आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.
पश्चिम बंगालमधील चंचलच्या श्रीहीपूर गावात मुर्मू प्रचार करत असताना सोमवारी ही घटना घडली. राज्यातील सत्ताधारी टीएमसीने आरोप केला आहे की भाजप उमेदवार प्रचाराच्या थेट प्रवाहात एका महिलेच्या गालावर चुंबन घेताना दिसले, या दरम्यानचा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.मात्र नंतर हा व्हिडिओ त्यांनी काढून टाकला.
If you cannot believe what you just saw, let us clarify. Yes, this is BJP MP & Maldaha Uttar candidate @khagen_murmu kissing a woman on his own accord on his campaign trail.
From MPs that sexually harass women wrestlers to leaders who make obscene songs about Bengali women, BJP… pic.twitter.com/f0PKdaDDn5
— All India Trinamool Congress (@AITCofficial) April 9, 2024
‘पश्चिम बंगालमधील सत्ताधारी टीएमसीने ही घटना ट्विटरवर शेअर केली आणि लिहिले,“तुम्ही नुकतेच जे पाहिले त्यावर तुमचा विश्वास बसत नसेल, तर स्पष्ट करूया. होय, हे भाजपचे खासदार आणि मालदहा उत्तरचे उमेदवार खगेन मुर्मू @khagenmurmu आहेत जे त्यांच्या प्रचारादरम्यान एका महिलेला स्वेच्छेने किस करत आहेत. कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करणाऱ्या खासदारांपासून ते बंगाली महिलांबद्दल अश्लील गाणी करणाऱ्या राजकारण्यांपर्यंत. टीएमसीने पुढे लिहिले की, भाजपच्या कॅम्पमध्ये महिला विरोधी नेत्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. अशा प्रकारे महिलांचा सन्मान करण्यासाठी जमले मोदींचे कुटुंब..! जर ते सत्तेवर आले तर ते काय करतील याची कल्पना करा.
भाजपचे उमेदवार खगेन मुर्मू या वादावर काय म्हणाले
दुसरीकडे भाजपचे उमेदवार खगेन मुर्मू म्हणाले की,’फोटो दिसणारी मुलगी “त्याच्या मुलीसारखी” होती. असं म्हणत त्यांनी आपली बाजू मांडली आहे.
खगेन मुर्मू पुढे म्हणाले की, ‘हा फोटो तृणमूलच्या कोणीतरी पोस्ट केला होता आणि हा व्हिडिओ अर्थवट एडिट करण्यात आला आहे. हे त्यांच्या घाणेरड्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. ज्या मुलीचे चुंबन घेतले जात आहे ती आमच्या कुटुंबाची मुलगी आहे. आमच्या एका कामगाराला एक मुलगी आहे जी बंगलोरमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. मी तिला माझ्या मुलीप्रमाणे समजतोतिचे आई-वडील दोघेही माझ्या शेजारी उभे होते. आजही मी त्या भागात प्रचार करत आहे. कोणीही वाईट मानले नाही. टीएमसी मतांसाठी माझ्यावर आरोप करत आहे.’
हे वाचाल का ? मायावती झाल्या सक्रिय…! यूपी पश्चिममध्ये भव्य पद्धतीने 10 रॅली काढणार