चिंबळी -केळगाव (ता. खेड) येथे समाज मंदिर व अंगणवाडीचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्या दिपाली काळे व ग्रामपंचायतीच्या फंडातून या वास्तू बांधण्यात आल्या आहेत. याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या दिपाली काळे, सरपंच सोनाली मुंगसे, उपसरपंच मनोज मुंगसे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत नामदेव मुंगसे, गणेश सोनवणे, बनेश ठाकर, विठाबाई गुंड, पार्वती म्हस्के, पुष्पाबाई विरकर, शारदा मुंगसे, रेश्मा मुंगसे, सतोष गुंड, ग्रामसेविका भारती म्हेत्रे यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग तसेच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.