पुणे – सध्या संपूर्ण देशात गणेश (ganpati) उत्सवामुळे आनंदाचे आणि मांगल्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबई, पुण्यासह वेगवेगळ्या शहरांमध्ये तर गणपतीमुळे तुफान उत्साह पाहायला मिळत आहे. अश्यातच अनेक सेलिब्रिटी सुद्धा लाडक्या गणरायाच्या दर्शनाला जाताना दिसत आहे.
नुकतंच अभिनेता ‘श्रेयस तळपदे’ (Shreyas Talpade) पुण्यात आला होता. यावेळी श्रेयस तळपदे याने प्रसिद्ध अश्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्याने दगडूशेठ गणपतीची (Dagdusheth Ganapati) आरतीही केली. अभिनेत्याला पाहण्यासाठी सभामंडपात शेकडो लोकांनी गर्दी केली होती. दर्शनानंतर त्याने बाप्पा विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. सोबतच त्याने दगडूशेठ बाप्पाच्या सजावटीची कौतुकही केलं.
मात्र, दर्शनाला जातानाचा किस्सा अभिनेत्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. श्रेयस तळपदेने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, सध्या त्याची ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनाला जात असताना आपण मंदिराचा रस्ता चुकलो असल्याचं श्रेयसने स्वतःच सांगितलंय.
श्रेयस (Shreyas Talpade) म्हणतो की, “देव आपल्याला गूढ मार्गाने भेटतो, आज तो मला बापू वाघमोडेच्या रूपाने भेटला… दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाकडे जाण्यासाठी मी वाटेत हरवलो आणि बाप्पू वाघमोडे आमच्याजवळ आले आणि मार्ग समजावून सांगिlतला… पण तरीही आम्हाला रस्ता सापडत नव्हता हे समजताच त्यांनी आम्हाला पुन्हा मार्ग दाखवला.
त्यामुळे आम्ही मंडपापर्यंत पोहोचलो याची खात्री करून घेऊन ते आम्हाला त्यांच्या बाईकवरून संपूर्ण मार्गापर्यंत सोडाला आले. धन्यवाद साहेब… प्रभु आपल्या अवतीभवती आहे.. याची जाणीव या घटनेने झाली… आपण त्याला ओळखले पाहिजे… तो आपल्याला भेटतो, आपल्याला मदत करतो, मार्गदर्शन करतो, आपल्याशी बोलतो…
आपल्याला तोच आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे… प्रत्येकाशी अत्यंत आदराने वागा कारण देव कोणत्या रुपात तुम्हाला भेटेल कधीच कळत नाही. गणपती बाप्पा मोरया.” असं अभिनेता म्हणतो. सध्या त्याची पोस्ट सगळीकडे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकरी देखील यावर प्रतिक्रिया देत आहेत.