सोनसाखळी चोऱ्या, मारामारीच्या घटनांना प्रतिबंध होणार; अत्याधुनिक दुचाकी दाखल
सातारा: सातारा जिल्ह्याची वाढती लोकसंख्या व गुन्हेगारी लक्षात घेत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नांमुळे 25 बीट मार्शलच्या नव्या अत्याधुनिक दुचाकी पोलीस दलात दाखल झाल्या आहेत. तेजस्वी सातपुते यांनी बुधवारी हिरवा झेंडा दाखवून या सर्व गाड्या कार्यरत केल्या.
पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे (गृह), सुहास गरुड, अजित टिके, सूरज गुरव, बी. बी. महामुनी, तानाजी बरडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, गजानन कदम उपस्थित होते.