शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर कायम ऍटिव्ह राहत आपल्या जीवनातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असते . नुकतंच फेब्रुवारीमध्ये तिने मुलीला जन्म दिला आहे. या मुलीच्या जन्मानंतर घरात सगळेच खूश आहेत.
शिल्पा शेट्टीची मुलगी समीशाचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे. या सरोगसीबाबत तिने एका वृत्तमाध्यमांना माहिती देतांना सांगितले कि,’ मुलगा वियान झाल्यानंतर शिल्पा व राज दुसऱ्या मुलाचे प्लानिंग करत होते. पण एका आजारामुळे शिल्पा आई बनू शकत नव्हती. कंसीव करूनही सारखे सारखे मिसकॅरेज होत होते. शेवटी त्यांना सरोगसीचा पर्याय निवडावा लागला.’
ती पुढे म्हणाली,’ वियानच्या जन्मानंतर बऱ्याच कालावधीनंतर दुसरे मुल हवे होते. पण, मला ऑटो इम्युन नावाचा आजार झाला होता. ज्याला APLA असेही म्हणतात. या आजारामुळे मी पुन्हा आई होण्याची इच्छा पूर्ण होऊ देत नव्हता. जेव्हा मी प्रेग्नेंट रहायचे तेव्हा हा आजार मध्ये येत होता आणि त्यामुळे गर्भपात व्हायचा. शेवटी त्यांना सरोगसीचा पर्याय निवडावा लागला.’
दरम्यान, शिल्पा शेट्टीला या आधी एक मुलगा आहे. त्याचे नाव वियान राज कुंद्रा आहे. त्याचा जन्म 2012 मध्ये झाला होता. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा 22 नोव्हेंबर 2009 रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर 11 वर्षांनी शिल्पा पुन्हा एकदा आई झाली आहे. शिल्पा आणि राज यांचा संसार आनंदात सुरू आहे. शिल्पा पुन्हा एकदा करिअरला सुरुवात करत आहे. सब्बीर खानच्या चित्रपटात ती झळकणार आहे.