बंगालमधील डॉक्‍टरांच्या समर्थनार्थ डॉक्‍टरांचा सोमवारी देशव्यापी संप

नवी दिल्ली- पश्‍चिम बंगालमध्ये हल्ला झालेल्या डॉक्‍टरांच्या समर्थनार्थ “इंडियन मेडिकल असोसिएशन’ने सोमवारी (दि. 17) डॉक्‍टरांचा देशव्यापी संप पुकारला आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारापासून डॉक्‍टरांच्या संरक्षणासाठी कायदा करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री हऋर्ष वर्धन यांनी सर्व राज्यांना केली होती.

त्या पार्श्‍वभुमीवर “आयएमए’ने ही देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. डॉक्‍टर आणि आरोग्यसेवकांवरील हिंसाचाराला प्रतिबंध करणारा केंद्रीय पातळीवरील एक सर्वसमावेशक कायदा करण्याची मागणीही “आयएमए’ने केली आहे. या कायद्यामध्ये अशी हिंसा करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद करण्यात यावी. तसेच भार्तीय दंड संहिता आणि गुन्हेगारी प्रक्रिया कोडमध्ये या संदर्भातील दुरुस्ती करण्यात यावी, अशीही मागणी “आयएमए’ने केली आहे.

देशव्यापी संपाच्या काळात रुग्णांसाठीच्या “ओपीडी’ अणि सर्व गैर अत्यावश्‍यक सेवा सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येतील. मात्र आपत्कालिन आणि अपघातानंतरची सेवा सुरूच राहणर आहे. “आयएमए’ने बंगालमधील डॉक्‍टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ चार दिवसांचे आंदोलनही पुकारले आहे. तसेच डॉक्‍टरांवरील हल्ल्याविरोधातल्या केंद्रीय कायद्याची मागणी करणारे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेही करण्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×