शिक्षक सोसायटीला 13 कोटींचा नफा

30 जूनला वार्षिक सर्वसाधारण सभा, सभासदांना 14 टक्के लाभांश

नगर: जिल्ह्यातील सुमारे साडे अकरा हजार माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामधेनु असलेल्या माध्यमिक शिक्षक सोसायटीला 12 कोटी 79 लाख रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सभासदांना 14 टक्के लाभांश व कायम ठेवीवरील व्याजाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष भास्कर कानवडे व उपाध्यक्ष चांगदेव खेमनर यांनी दिली.

माध्यमिक शिक्षक सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा 30 जून रोजी साडे 12 वाजता हॉटेल नंदनवन येथे होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कानवडे व खेमनर यांनी सांगितले की संस्थेने 32 कोटी 43 लाख रूपयांच्या अत्यावश्‍यक तरतुदी करताना 633 कोटी रूपयांचे कर्जवाटप साडे नऊ व आता 9 टक्के व्याजदराने केले. सभेच्या दुसऱ्या दिवशी सभासदांना 14 टक्के लाभांश व 6.48 टक्के कायम ठेवीवरील व्याज आणि वर्गणीवरील व्याजापोटी 24 कोटी 69 लाख रुपयांचे वाटप पगार खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.

संस्थेच्या ठेवीत मागील आर्थिक वर्षात 71 कोटी 96 लाख रूपयांची वाढ होऊन त्या 46 कोटीपर्यंत पोहोचल्या आहेत. गुंतवणूक 59 कोटी 51 लाख रूपयापर्यंत पोहोचल्या आहेत. सभासदांच्या मुलीच्या विवाहापोटी सुरू केलेल्या पुरोगामी कन्यादान योजनेंतर्गत 23 लाख 30 हजार रुपयांचे कन्यादान वाटप केले आहे. यापुढे या रकमेत 15 हजार रूपयांपर्यत वाढ केली आहे. मुलींबरोबरच आता सभासदांच्या मुलांच्या विवाहासाठी ही रक्कम मिळणार आहे. ज्यांना हि रक्कम मिळाली नाही. त्यांना निवृत्तीनंतर कृतज्ञता निधीत हि रक्कम दिली जाणार आहे. संस्थेने 268 सेवानिवृत्त सभासंदाना 25 लाख 46 हजार 500 रूपयांचा कृतज्ञता निधी वाटला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×